मलकापूर 31/5/22 येथील पत्रकार क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे मलकापूर दिपक इटणारे यांची हिंदी-मराठी पत्रकार संघटने च्या मलकापूर शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. सदर निवड महाराष्ट्रातील तळागाळातील सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहाल व सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा हीच आशा बाळगत आपली निवड करण्यात आली आहे.
तर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघटना धनश्रीताई काटीकर यांनी नियुक्तीपत्र देऊन केली त्यावेळी विदर्भ समन्वयक विदर्भ संघटक अजय टप विदर्भ सचिव सतीश दांडगे तालुका अध्यक्ष उल्हास शेगोकार करणसिंग सिरसवाल, नागेश सुरंगे बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख , मलकापूर लाईव्ह मुख्य संपादक करण झनके तालुका संघटक हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली आहे.
सदर निवडीबद्दल इटणारे यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
