Tuesday, May 31, 2022

दीपक इटणारे यांची हिंदी-मराठी पत्रकार संघटनेच्या मलकापूर शहराध्यक्ष निवड



 मलकापूर 31/5/22 येथील पत्रकार  क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे मलकापूर दिपक इटणारे यांची हिंदी-मराठी पत्रकार संघटने च्या मलकापूर शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. सदर निवड महाराष्ट्रातील तळागाळातील सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहाल व सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा हीच आशा बाळगत आपली निवड करण्यात आली आहे.

    तर  महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघटना धनश्रीताई काटीकर यांनी नियुक्तीपत्र देऊन केली त्यावेळी   विदर्भ समन्वयक विदर्भ संघटक अजय  टप  विदर्भ सचिव  सतीश दांडगे तालुका अध्यक्ष उल्हास शेगोकार करणसिंग सिरसवाल, नागेश सुरंगे बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख , मलकापूर लाईव्ह मुख्य संपादक करण झनके तालुका संघटक हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र देऊन  निवड करण्यात आली आहे.

सदर निवडीबद्दल इटणारे यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Monday, May 23, 2022

रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या परिचारिका वर कारवाई करा - हिंदी मराठी पत्रकार संघाची मागणी


मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

    उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथील परिचारिकेने रुग्णालयातील भारतीय रुग्णांना सलाईन लावण्यासाठी अस्वच्छ सिजर चा वापर करून रुग्णांची जीव धोक्यात घातल्या प्रकरणी कारवाई करण्याच्या आशयाचे निवेदन हिंदी-मराठी पत्रकार संघा तर्फे उपविभागीय अधिकारी 

 या निवेदनात नमूद केले आहे की गेल्या दोन वर्षापासून देशाला कोरोना  संकटाने ग्रासलेल्या आहेत त्यापासून बचावासाठी हॅन्ड ग्लोज, फेस मास्ट सैनेटायझर इत्यादी गोष्टीचा वापर करण्याच्या सूचना असताना उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथील वार्डात भरती असलेल् पेशंटला सलाईन लावताना हायजेनिक अब्रो टेप चा वापर न करता त्याऐवजी सलाईन च्या कार्टून ला येत असलेल्या अस्वच्छ स्टिकर चा वापर सलाईन लावण्यासाठी आपल्या हॉस्पिटल मधील परिचारिका मंगला उईके करत होत्या कोरोना संसर्ग लक्षात घेता कोणत्या प्रकारचे सुरक्षा साधने तर त्यांनी वापरली नाहीच शिवाय सलाईन लावण्यासाठी असलेल्या हायजेनिक चिकटपट्टी चा वापर त्यांनी जाणीवपूर्वक टाळला. यासंदर्भात यांना विचारणा केली असता चिकट टेप घेण्यासाठी ऑफिसमध्ये जावे लागते म्हणून वार्ड मध्ये पडलेल्या अस्वच्छ स्टिकर लावण्याचे त्यांनी सांगितले. 

    अशा अस्वच्छ स्टिकर मुळे कोरोना, एड्स सह इतर जीवघेण्या रोगांचा संसर्ग होण्याचे नाकारता येत नाही. याबाबत दवाखान्यातील या परिचारिका मंगला उईके यांना विचारले असता, त्यांनी  तुम्हाला जे काही सांगायचे असेल ते वैद्यकीय अधीक्षकांना सांगा आणि सलाईन लावून तुमच्यावर उपकार केलेत आणि तुम्ही आम्हाला ज्ञान शिकवत आहेत अशा भाषेत पेशंट ची कान उघडणी करण्यात आली. सदर परिचारिका बुलढाणा येथून अपडाऊन करीत असल्यामुळे बुलढाणा जाण्यासाठी ड्युटीच्या वेळेआधीच घाईघाईने निघून जाते त्यामुळे घाई घाई मध्ये रुग्णांच्या जीवांची अशा पद्धतीने खेळ करते. तरी मेहरबान साहेबानी सदर रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या परिचारिका वर कारवाई करून त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे जेणेकरून पुन्हा रुग्णांच्या जीवाशी अशा प्रकारे कोणताही कर्मचारी खेळ करणार नाही हॉस्पिटलमधील डॉक्टर परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने जसे हॅन्ड ग्लोज मास्क वापरणे बंधनकारक करावे व त्यांना आपले ओळखपत्र किंवा नेम बॅच नेहमी सर्व नागरिकांना दिसतील अशा पद्धतीने परिधान करणे सक्तीचे करावे हॉस्पिटलमध्ये तक्रार निवारण कक्ष स्थापन करून तक्रार रजिस्टर सर्व नागरिकांना उपलब्ध होईल याची व्यवस्था करून अशा पद्धतीची गैरसोय होणा याची दक्षता घ्यावी.

    सदर निवेदन देताना धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, हिंदी मराठी पत्रकार संघ, श्रीकृष्ण तायडे विदर्भ समन्वयक, सतीश दांडगे विदर्भ सचिव, अजय टप विदर्भ प्रसिद्धीप्रमुख, गौरव खरे जिल्हाध्यक्ष, उल्हास भाई शेगोकार तालुका अध्यक्ष , अनिल गोठी तालुका उपाध्यक्ष, प्रा प्रकाश थाटे कोषाध्यक्ष, योगेश सोनोने शहर संघटक, नथुजी हिवराळे ज्येष्ठ पत्रकार, विनायक तळेकर, करणसिंग सिरसवाल यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.



Wednesday, May 4, 2022

मलकापूर शहरात पत्रकारांच्या हक्काचे पत्रकार भवणासाठी जागा द्या - हिंदी मराठी पत्रकार संघाची मागणी







मलकापूर येथे पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आज हिंदी मराठी पत्रकार संघाचे वतीने उपविभागीय अधिकारी यांचे कडे एका निवेदनाव्दारे  करण्यात आली .
      बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर हे मोठी बाजारपेठ व रेल्वे स्थानक असलेले शहर आहे येथे जिल्ह्यातील भरपूर नागरिकांचे आवक -जावक रोज सुरू असते त्यात अनेक क्राईम ही घडत असतात. यात मोलाचा वाटा म्हणजे एक पोलीस तर दुसरा पत्रकार असे असते. व तोच पत्रकार आज कुठल्याही घटनेची बातमी बनवायची असली तर त्याला याच्या त्याच्या प्रतिष्ठानात जाऊन बसावे लागते. काही राजकीय पक्ष आपल्या पत्रकार परिषद नेहमी घेत असतात त्यासाठी पण कुठेतरी ते बोलावतील त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली जाते. हीच सर्व काम करण्याकरिता पत्रकाराला खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पत्रकारांना त्यांच्या हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आज हिंदी मराठी पत्रकार संघाचे वतीने उपविभागीय अधिकारी यांचे कडे एका निवेदनाव्दारे  करण्यात आली. या निवेदनात म्हटले आहे की नगर परिषद यांच्या मालकीची मलकापूर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या भागात नगर परिषदेची शाळा क्रमांक 1 ही रिकामी पडली असून ती जागा पत्रकार भवणासाठी आपण द्यावी. यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघाचे धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, श्रीकृष्ण तायडे विदर्भ समन्वयक, गौरव खरे जिल्हाध्यक्ष, अजय टप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, उल्हासभाई शेगोकार तालुका अध्यक्ष, कृष्णा मेसरे जिल्हा प्रवक्ता, स्वप्निल आकोटकर जिल्हा सचिव, अनिल गोठी तालुका उपाध्यक्ष, श्रीकृष्ण भगत शहर सचिव, संदीप सावजी, विनायक तळेकर, बलराम बावस्कर, दीपक इटनारे, नथूजी हिवराले, नागेश सुरंगे, करणसिंग सिरसवाल, प्रा प्रकाश थाटे कोषाध्यक्ष, प्रमोद हिवराळे, धरमेशसिंह राजपूत, अनिल झनके, सय्यद ताहेर, योगेश सोनवणे, हे सर्व उपस्थित होते.